सिद्दीकी हत्या प्रकरणात तुरूंग अधीक्षक निलंबित - Marathi News 24taas.com

सिद्दीकी हत्या प्रकरणात तुरूंग अधीक्षक निलंबित

www.24taas.com, पुणे 
 
पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैदी मोहम्मद ऊर्फ कातील सिद्दीकी याच्या हत्याप्रकरणात येरवडा कारागृहाचे अधीक्षक शरद व्ही. खटावकर यांना निलंबित करण्यात आलंय. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही घोषणा केलीय. तसंच आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय.
 
पुण्याच्या येरवडा कारागृहात एका कैद्याची गळा दाबून हत्या करण्यात आलीय. मोहम्मद उर्फ कातील सिद्दीकी असं या कैद्याचे नाव असून त्यानं पुण्यातील दगडशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यात तो यशस्वी झाला नव्हता.  एटीएसनं त्याला २ मे रोजी दिल्लीतून अटक केली होती. तो इंडियन मुजाहिद्दीनं गटाचा संशयित दहशतवादी असून जर्मन बेकरी स्फोटातील मुख्य आरोपी यासीन भटकळचा सिद्दीक हा साथीदार आहे. २७ वर्षीय कातील सिद्दीकी हा मूळचा बिहारचा होता. त्याला येरवड्याच्या तुरुंगात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. पुण्यातील गुंड शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या दोघांनी त्याची गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे. पायजम्याच्या नाडीने सकाळी १०.३० च्या सुमारास त्याचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली.
 
.

First Published: Friday, June 8, 2012, 18:04


comments powered by Disqus