Last Updated: Friday, June 8, 2012, 23:41
www.google.com, पुणे इंग्लंडमधल्या लँकस्टायर विद्यापीठानं अनुज बिडवेच्या नावानं शिष्यवृत्ती सुरु केलीय. पुणे विद्यापीठात या शिष्यवृत्तीची घोषणा आज करण्यात आली. त्यावेळी अनुजचे पालक उपस्थित होते.
अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठातले विद्यार्थीच या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.शिष्यवृत्ती मिळालेला विद्यार्थी लँकस्टायर विद्यापीठात एक वर्ष पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकणार आहे. त्याचा राहण्याचा आणि फी चा संपूर्ण खर्च विद्यापीठ उचलणार आहे. अनुज बिडवेची लंडनमध्ये हत्या करण्यात आली होती. लँकस्टायर विद्यापीठात तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याला आदरांजली म्हणून ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आलीय.
First Published: Friday, June 8, 2012, 23:41