वारक-यांच्या ट्रकला अपघात - Marathi News 24taas.com

वारक-यांच्या ट्रकला अपघात

www.24taas.com, अहमदनगर
 
अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ वारक-यांच्या ट्रकला अपघात झालाय. ट्रकचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात सहा वारकरी जखमी झालेत.
 
जखमींना अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पुलाच्या कठड्याला धडक बसलेला ट्रक सुदैवानं खाली कोसळला नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी परभणीहून आळंदीकडे निघाले होते.

First Published: Sunday, June 10, 2012, 20:32


comments powered by Disqus