Last Updated: Sunday, June 10, 2012, 21:47
www.24taas.com, सातारा साता-यातही भ्रूणहत्येचा प्रकार उघड झालाय. सातारा जिल्ह्यातल्या काशीळ गावातल्या एका बोगस डॉक्टरनं एका महिलेचा गर्भपात केलाय. सिकंदर शेख असं या डॉक्टरचं नाव आहे.
या डॉक्टरने सतरा आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात केलाय संबधित महिलेला दोन मुली आहेत. ही महिला तिस-यांदा गर्भवती होती. सिकंदर शेखनं तिचा गर्भपात घडवून आणला. याबाबत कराड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर रामचंद्र मदने यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिकंदर शेखच्या हॉस्पिटलवर छापा टाकला. यावेळी त्याच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपाताची औषधं सापडली.
मात्र सोनोग्राफी मशीन सापडलं नाही. भ्रूण एका शेतात पुरल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी महिलेचा पती आणि डॉक्टरला ताब्यात घेतलयं. सिकंदर एका गर्भपातासाठी दहा हजार रुपये घेत असल्याची माहिती मिळालीये. महिलेचा पती आणि डॉक्टरला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय.
First Published: Sunday, June 10, 2012, 21:47