Last Updated: Sunday, June 10, 2012, 22:08
www.24taas.com, जुन्नर जुन्नरजवळ जीवधन किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या सहाही तरुणांची अखेर सुखरुप सुटका झालीय. २४ तासांच्या थरारानंतर अखेर या तरुणांची सुटका झालीय.
हे सहाही तरुण पुण्यातले असून, फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आहेत..गिर्यारोहणासाठी ते नाणेघाटात गेले होते.. मात्र दुस-या रस्त्याची निवड केल्याने ते जीवधन किल्ल्याच्या दरीत अडकले.. काल संध्याकाळी हे तरुण या भागात अडकले होते.
त्या ठिकाणी मोबाईलची रेंजही नव्हती.. अखेर आज सकाळी 11च्या सुमारास त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क झाला.. त्यानंतर जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे गिर्यारोहक तातडीनं या ठिकाणी पोहोचले, आणि अखेर त्यांची सुटका झाली..
First Published: Sunday, June 10, 2012, 22:08