कलमाडी पुन्हा महापालिकेत! - Marathi News 24taas.com

कलमाडी पुन्हा महापालिकेत!


www.24taas.com, पुणे
 
तब्बल दोन वर्षांनंतर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी महापालिकेत जाणार आहेत. कलमाडींना कॉमन वेल्थ घोटाळा प्रकऱणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. त्यामुळं महापालिकेत त्यांच्या सोबत कोण उपस्थित राहणार याकडं लक्ष लागलंय.
 
कलमाडी गेल्या वर्षभरापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र ते पडद्यामागून सुत्रं हलवतंच होते. त्यामुळे आजचा त्यांचा महापालिकेतला प्रवेश म्हणजे पुण्याच्या राजकारणात कमबॅक असल्याचं बोललं जातय. दुपारी महापालिकेत जाऊन कलमाडी आयुक्तांबरोबर चर्चा करणार आहेत तसंच क्रीडा समितीच्या कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत.
 
निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने कलमाडींना निवडणुकांच्या प्रचारापासून चार हात लांब ठेलं होतं. पुण्यात कलमाडी समर्थकांकडून बसकांडातील जखमींना कलमाडी भेटणार असल्याची पत्रक वाटण्यात आली होती. पक्षाकडून त्यांना पुण्यात जाण्यासही मनाई करण्यात आली होती. मात्र आता कलमाडी महापालिकेत जाणार आहे.
 

First Published: Monday, June 11, 2012, 20:30


comments powered by Disqus