कलमाडी होणार अजित दादांना वरचढ? - Marathi News 24taas.com

कलमाडी होणार अजित दादांना वरचढ?

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात कलमाडी सक्रिय होताच, काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये आरोप, प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुणेकर पाणी टंचाईनं त्रस्त होते, त्यावेळी कलमाडी कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे.
 
पुण्याचं कुठचं पाणी, कुठे वळवलं, याचा शोध लावणार असल्याचं कलमाडी काल म्हणाले होते. त्याला राष्ट्रवादीनं ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांना लक्ष्य करत कलमाडींनी राष्ट्रवादीला हे आव्हान दिलं होतं.
 
त्यामुळे आता अजित पवार आणि कलमाडी हे पुन्हा आमनेसामने येणार आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे आता पुण्यात नक्की कोण भारी पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, June 12, 2012, 20:29


comments powered by Disqus