Last Updated: Wednesday, June 13, 2012, 21:08
www.24taa.com, सांगली सांगलीतल्या माहेर हॉस्पिटलची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. राज्यात सध्या स्त्री-भ्रूणहत्येची प्रकरणं चांगलीच गाजत आहे.
सोनोग्राफी सेंटर्सविरोधात राज्य सरकारनं कडक कारवाई सुरू केल्यानंतर सांगलीतल्या माहेर हॉस्पिटलमध्येही अपुरे रेकॉर्ड सापडले होते. त्यानंतर हॉस्पिटलची सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलीय. या कारवाईनंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत 'माहेर हॉस्पिटलवर दगडफेक करत हॉस्पिटलची तोडफोड केली.
यावेळी आंदोलकांना पिटाळण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली. आंदोलन करणाऱ्या सहा पुरुष आणि दोन महिला आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
First Published: Wednesday, June 13, 2012, 21:08