सोलापुरात विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला - Marathi News 24taas.com

सोलापुरात विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

www.24taas.com, सोलापूर
 
सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डूवाडीतल्या के.एन.भिसे ज्युनिअर कॉलेजमधल्या अकरावीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षक आणि कॉलेजच्या वादात विद्यार्थी भरडले जात आहेत.
 
कॉलेजमध्ये गेल्या चार वर्षांपासून काम करणा-या हंगामी शिक्षक पी.डी. चोपडे यांनी सेवेत घेण्याची मागणी केली. मात्र प्रशासन चालढकल करत असल्यानं त्यांनी जानेवारीत झालेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकाच गायब केल्या. चोपडे उत्तरपत्रिका देत नसल्यानं कॉलेजनं फेरपरीक्षा घेतली. त्यामुळं विद्यार्थी गोंधळून गेले.
 
फेरपरीक्षेऐवजी कॉलेजनं अंतर्गत वाद मिटवावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यावरुन प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यामुळं गोंधळात फेरपरीक्षा उधळून लावली. यात आता विद्यार्थी फेरपरीक्षा द्यायची की बारावीचा अभ्यास करायचा अशा गोंधळात विद्यार्थी आहेत.

First Published: Thursday, June 14, 2012, 12:26


comments powered by Disqus