Last Updated: Saturday, June 16, 2012, 18:13
www.24taas.com, पुणे 
राष्ट्रपतींच्या उमेदवाराबाबत ममता बॅनर्जी जास्त टोकाची भुमिका घेणार नाहीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
ममता या 'बॅंगॉल प्राईड' मानणाऱ्यांपैकी आहेत. त्यामुळं त्या प्रणवदांना पाठिंबा देतील, असंही ते म्हणाले आहेत. युपीएकडे राष्ट्रपतीपदासाठी आवश्यक मतांपेक्षा जास्त मते असल्याचं पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल केलेले पी. ए. संगमा यांच्याशी पक्ष बैठकीत चर्चा करणार आहे. संगमा उमेदवारी मागे घेतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे.
First Published: Saturday, June 16, 2012, 18:13