Last Updated: Saturday, June 16, 2012, 19:28
www.24taas.com, पुणे 
मुख्यमंत्री आणि शरद पवारांवरील कोपरखळ्या सुरुच आहेत. उद्योगधंद्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर पवारांनी पुण्यात टोला लगावला आहे. उद्योगधंद्याविषयी जे बोललो ते चुकीचं नाही.
सरकारनं त्यात सुधारणा केली असेल तर चांगलच आहे, असं पवार म्हणाले आहेत. मी नियोजन आयोगाचा सदस्य आहे. मला महाराष्ट्र माहित आहे. मी या राज्याचा सीएम राहिलो आहे, अशी समज द्यायलाही पवार विसरले नाहीत.
उद्योगांच्या धोरणाबाबत टीका करण्याआधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं होतं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं होतं. राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याबाबतची टीका गैरसमजातून होते आहे. असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं होती.
First Published: Saturday, June 16, 2012, 19:28