Last Updated: Monday, June 18, 2012, 17:32
www.24taas.com, पुणे गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली.
निगडीच्या भक्ती-शक्ती उद्यानाजवळ एका होंडासिटी कारमध्ये बसलेल्या युवकावर गोळीबार करण्यात आला. गाडीत बसलेल्या परिचित व्यक्तीनेच गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जयदीप भगवान देवकुळे (25,रा. वाशी, नवी मुंबई) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. . या घटनेत जयदीप गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयदीपची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
First Published: Monday, June 18, 2012, 17:32