राज ठाकरेंच्या पत्नी झाल्या वारकरी - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंच्या पत्नी झाल्या वारकरी

www.24taas.com,  जेजूरी
 
विठूरायाच्या भेटीसाठी सारे वारकरी आतुर झालेत.. मजल दरमजल करत वार-यांच्या दींड्या आणि पालख्या मार्गक्रमण करत आहेत. लहान थोर, आबालवृद्ध सारेच पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी वारकरी झाल्या होत्या. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह दिसून आला.
 
मग यांत राजकारणी मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय तरी कसे मागं राहतील... याचाच प्रत्यय ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत आला. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या एक दिवसासाठी वारकरी बनल्या होत्या.. सासवड ते जेजुरी असा वारक-यांसोबत चालत प्रवास त्यांनी केला.
 
शिवाय महिला वारक-यांसोबत विठूरायाच्या नामस्मरणात  शर्मिला ठाकरे दंग झाल्या होत्या... यावेळी दांडपट्टा आणि तलवारबाजी असे मर्दानी खेळही सादर करण्यात आले.. जेजुरीच्या खंडोबाचंही त्यांनी दर्शन घेतलं... माऊलींच्या पालखीत वारक-यांसोबत चालण्याचा अनुभव आनंददायी होता अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी 'झी २४ तास'ला दिली.
 
व्हिडिओ पाहा...

First Published: Monday, June 18, 2012, 09:01


comments powered by Disqus