ट्रक अपघातात नऊ वारकरी ठार - Marathi News 24taas.com

ट्रक अपघातात नऊ वारकरी ठार

www.24taas.com, पुणे 

नीरा नदीच्या पुलावरुन ट्रक कोसळला. या अपघातात नऊ वारकरी ठार झाले तर सातजण जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बारामतीतील कांबळेश्वर गावचे रहिवासी आहेत.
 
मृतांमध्ये सात महिला आणि दोन पुरुषांता समावेश आहे. ठार झालेल्यांमध्ये ट्रक चालक आणि दिंडी प्रमुख गणपत गोसावी यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  जखमींवर लोणंदच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 
वारीत सहभागी झालेल्या एका दिंडीचा ट्रक  पुलावरुन ओव्हरटेक करुन वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली, असे स्थानिकांनी सांगितले.
 
व्हिडिओ पाहा
 

First Published: Tuesday, June 19, 2012, 08:53


comments powered by Disqus