Last Updated: Thursday, December 8, 2011, 17:25
झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर 
गोपीनाथ मुडें यांनी वीजेच्या प्रश्नावरून सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. वीजप्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांना चांगलेच टोले हाणले. महाराष्ट्रात वीजेचा प्रश्नानी सर्वसामान्यांना चांगलेच वेठीस धरले आहे आणि त्यामुळे गोपीनाथ मु्ंडे यांनी आता सरकारला याविषयावर 'टारगेट' करण्याचे ठरवले आहे.
एक रूपया प्रति युनीट दरानं यंत्रमागासाठी वीज देणं शक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी उर्जा खात्याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे त्यांना याबाबत माहिती नसल्याची टीका गोपीनाथ मुंडे यांनी कोल्हापुरात केली. तसच मुख्यमंत्र्यांनी जरी उर्जा खात्याचा अभ्यास करायचा ठरवला तरी अजित पवार तो करू देतील का ? असा सवालही मुंडेंनी उपस्थित केला. इचलकरंजी इथं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
First Published: Thursday, December 8, 2011, 17:25