राणेंच्या बैठकीत उद्योजकांचा गोंधळ - Marathi News 24taas.com

राणेंच्या बैठकीत उद्योजकांचा गोंधळ


झी २४ तास वेब टीम, सांगली
 
सांगलीत नारायण राणे आणि उद्योजकांच्या बैठकीत उद्योजकांनी चांगलाच गोंधळ घातला. सांगलीतल्या उद्योजकांची गा-हाणी ऐकण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे सांगलीत आले होते.
 
विविध कर आणि अनेक अडचणींमुळे अनेक उद्योग धंदे कर्नाटकात जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी महापौर इद्रीस नायकवडी यांनी आपल्या भाषणातून काही वादग्रस्त मुद्दे मांडताच उद्योजकांनी एकच गोंधळ घातला.
 
कर्नाटकात कोणत्याही सुविधा उपलब्ध नसून तिथं उद्योजकांना फारसा वाव मिळणार नसल्याचं सांगत पालिकेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संतप्त उद्योजकांनी त्यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर नारायण राणे यांनी महापौर हे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी उद्योजकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा, प्रशासकीय अडचणींबाबत आयुक्त उत्तरे देतील अशा शब्दांत इद्रीस नायकवडींना फटकारलं.

First Published: Friday, December 9, 2011, 06:56


comments powered by Disqus