Last Updated: Friday, June 22, 2012, 17:47
www.24taas.com, बारामती 
बारामतीमध्ये एमआयडीसीत असलेल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीत आग लागली आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ही आग लागली असल्याचे वृत्त काही वेळापूर्वीच हाती आले आहे. त्यामध्ये कापसाच्या पाच हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत.
बारामती एमआयडीसीतील टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये आग लागल्याचे समजते. मात्र अजूनही आगीचं कारण समजू शकलेलं नाही. गोडाऊनमधील कापसाच्या 5 हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत.
त्यामुळे आगीचं शुक्लकाष्ठ काही केल्या संपेना. मुंबई, पुण्यापाठोपाठ बारामतीत आगडोंब पसरला आहे. बारामतीत लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं आहे.
First Published: Friday, June 22, 2012, 17:47