मनसेच्या 'त्या' जोडप्याची 'लग्नाची तिसरी गोष्ट' - Marathi News 24taas.com

मनसेच्या 'त्या' जोडप्याची 'लग्नाची तिसरी गोष्ट'

www.24taas.com, पिंपरी चिंचवड
 
एका लग्नाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. एका लग्नाची दुसरी गोष्टही तुम्ही पाहत आहात. परंतू आता तुम्हाला  सांगणार आहोत एका लग्नाची तिसरी गोष्ट. ही गोष्ट आहे पिंपरीतल्या महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि मनसे नगरसेविका अश्विनी मराठे यांच्या लग्नाची. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या एका लग्नाची जोरात पूर्वतयारी सुरु आहे.
 
हे लग्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अश्विनी मराठे आणि त्यांचा प्रियकर सचिन चिखले यांचं. महापालिका निवडणुकीत या दोघांची बरीच चर्चा झाली होती. कारण या जोडीनं निवडणूक जिंकूनच लग्न करण्याचा पण केला होता. पिंपरीतल्या निगडी प्रभागात मनविसेचे शहराध्यक्ष सचिन चिखलेंनी निवडणुकीच्या दृष्टीनं चांगलीच मोर्चेबांधणी केली होती... परंतु हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यानं त्यानं थेट आपल्या प्रेयसीलाच मैदानात उतरवलं आणि जोरदार प्रचार करत निवडणूक जिंकूनच लग्न करण्याचा चंग बांधला...
 
अखेर झालंही तसंच... राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष सुमन पवळे  यांचा पराभव करत अश्विनी मराठे या विजयी झाल्या. आता ही जोडी 26 जूनला विवाह बंधनात अडकतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची वेळ मिळाली नसल्यानं त्यांनी  लग्नाची तारीख दोनवेळा पुढ ढकलंली. त्यामुळंच राज यांची वेळ घेऊन 26 जूनची तारीख निश्चित केलीय. पिंपरीत ४ जागा जिंकत मनसेन पहिल्यांदाच खात उघडलं... मनसे जेवढी त्यामुळं चर्चेत आली, तेवढीच सचिन आणि अश्विनी यांच्या प्रेम कहाणी मुळही चर्चेत आली.
 
संबंधित बातमी
 
प्रियकरानं मनसेचं तिकीट दिलं प्रेयसीला

 
 
 

First Published: Saturday, June 23, 2012, 22:30


comments powered by Disqus