Last Updated: Monday, June 25, 2012, 11:06
www.24taas.com,पुणे पुण्यातल्या एनडीएमध्ये कर्मचारी भरतीतील गैरव्यवहार पुढे आला आहे. याप्रकरणी कर्नल कुलबीर सिंगसह इतर पाच कर्मचा-यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या सर्वांना सीबीआयने शनिवारी रात्री एनडीएमधून अटक केली होती. त्यांना शिवाजीनगर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयानं या सर्वांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. एनडीएमध्ये चतूर्थ श्रेणी कर्मचा-यांची भरती करण्यात आली होती. यात ९६ जागा भरताना आरोपींनी प्रत्येक जागेसाठी चार ते पाच लाख रुपये उमेदवारांकडून घेतल्याचा सीबीआयचा संशय आहे.
कर्नल कुलबीर सिंग यांच्या घरी ८२ लाख रुपयांची रोकड सीबीआयला सापडलीय. तर इतर संशयित कर्मचा-यांच्या घरातून सुमारे ७० लाख रुपये जप्त करण्यात आलेत. या घोटाळ्यात लष्कराच्या आणखी काही अधिकारी आणि कर्मचा-यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
First Published: Monday, June 25, 2012, 11:06