'मनसे'च्या प्रेमी युगुलाला राज ठाकरेंचा आशीर्वाद - Marathi News 24taas.com

'मनसे'च्या प्रेमी युगुलाला राज ठाकरेंचा आशीर्वाद

www.24taas.com, पिंपरी चिंचवड
 
पिंपरी चिंचवड या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच ढोल ताश्याच्या गजरात मोठ स्वागत करण्यात आलं. निमित्त होतं मनसे नगरसेविका अश्विनी मराठे आणि मनविसे शहराध्यक्ष या जोडप्याला शुभेच्छा देण्याचं.
 
महापालिका निवडणुकीत मैदानात उतरलेल्या अश्विनी मराठे यांनी निवडणूक जिंकल्यावरच लग्न करीन तेही राज ठाकरे यांच्या उपस्थितीत असा पण केला होता. त्याप्रमाणे अश्विनी मराठे निवडूनही आल्या. आणि राज ठाकरे यांनी उपस्थित रहावं म्हणून या जोडप्यान दोन वेळा लग्नही पुढ ढकललं. आता  मनसे नगर सेविका अश्विनी मराठे आणि मनविसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा उद्या विवाह होणार आहे.
 
त्याला राज ठाकरे उपस्थित राहू शकत नसल्यानं त्यांनी आज सपत्नीक  अश्विनी मराठे आणि सचिन चिखले यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अश्विनी मराठे आणि सचिन चिखले यांच्या या 'लग्नाची गोष्ट' 'झी २४ तास'न दाखवली होती. त्यामुळेच राज ठाकरे भेटून गेल्याची प्रतिक्रिया अश्विनी मराठे यांनी यावेळी दिली.
 
संबंधित बातम्या
 
मनसेच्या ‘त्या’ जोडप्याची ‘लग्नाची तिसरी गोष्ट’
 
प्रियकरानं मनसेचं तिकीट दिलं प्रेयसीला
 
 
 
 
 

First Published: Monday, June 25, 2012, 21:17


comments powered by Disqus