शाळा सोडू नये म्हणून मुलांना 'मिरचीची धुरी' - Marathi News 24taas.com

शाळा सोडू नये म्हणून मुलांना 'मिरचीची धुरी'

www.24taas.com, कोल्हापूर 
 
कोल्हापूर जिल्ह्यातील एका निवासी शाळेत शिकणाऱ्या दोन भावंडांना मिरच्यांची धुरी देऊन, काठीने अमानुष मारहाण करण्यात आली. शाळेतील असुविधांमुळे शिकणे अवघड झाल्याने ही मुलं पुन्हा आपल्या गावी निघाली होती.
 
त्यांना कोल्हापूर बस स्टॅण्डवरून पुन्हा शाळेत नेऊन मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिपायाने हा प्रकार केला आहे. शाळेत नव्याने दाखल झालेल्या मुलांसमोर  वैभव आणि संतोष गुरव भावंडांना मिरच्याची धुरी देऊन काठीने मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे वैभव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
तर या प्रकरणाची भूदरगड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाळा सोडून जाऊ नये म्हणून  मुख्याध्यापक ए.व्ही.पाटील, शिपाई शशिकांत किरुळकर आणि तानाजी भोकर यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, June 26, 2012, 00:02


comments powered by Disqus