पोलिसांनी तर मंगल कार्यालही सोडलं नाही - Marathi News 24taas.com

पोलिसांनी तर मंगल कार्यालही सोडलं नाही

www.24taas.com , सातारा
 
सातारा पोलिसांनीच एका मंगल कार्यालयाचे पैसै थकवण्याचा धक्कादायक प्रकार जनता दरबारात उघड झालाय. साता-यात डिसेंबर 2010 मध्ये 38 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
 
त्यासाठी वैन गावातील श्रीराम मंगल कार्यालय 5-6 दिवस दीडशे खेळाडूंनी वापरलं. पण त्याच्या भाड्याचे 25 हजार रुपये अजूनही पोलिसांकडून येणं बाकी आहे. दोन वर्षांपुर्वीचं हे बिल तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या बदलीचं कारण पुढे करत अजूनही मंजूर करण्यात आलेलं नाही. सातारा पोलिसांची जिल्ह्यातली कामगिरी तुलनेने चांगली आहे.
 
पण सातारा जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या जनता दरबारात हा प्रकार समोर आलाय. आता ज्ञानदेव ननावरे या अन्यायाविरोधात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे दाद मागणार आहेत.
 
 
 
 

First Published: Monday, June 25, 2012, 23:50


comments powered by Disqus