सोलापूर-पुणे मार्ग आजपासून चार तास बंद - Marathi News 24taas.com

सोलापूर-पुणे मार्ग आजपासून चार तास बंद

www.24taas.com, सोलापूर
 
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग आजपासून चार तास बंद ठेवण्यात  येणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
 
या महामार्गावर येणारे मोडनिंबचे रेल्वेगेट आजपासून दररोज चार तास बंद  ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर-पुणे महामार्ग चार तास बंद राहणार आहे. आधीच ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत असल्याने त्यात भर पडणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत होणार आहे.
 
सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गाला मोडनिंब येथे कुर्डूवाडी-पंढरपूर हा रेल्वेमार्ग क्रॉस होतो.  त्यामुळे फाटक किमान दहा मिनिटे बंद ठेवण्यात येते त्यामुळे दोन्ही बाजूला किमान एक कि. मी. पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागतात. त्यामुळे गेट बंद ठेवण्या ऐवजी या ठिकाणी उड्डान पूल बांधण्याची मागणी होत आहे.

First Published: Tuesday, June 26, 2012, 08:29


comments powered by Disqus