मुलींचा जीव घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News 24taas.com

मुलींचा जीव घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

www.24taas.com, मुंबई  
 
बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्यात आलाय. याप्रकरणी दोन डॉक्टरांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. यावेळी इथं गर्भलिंगनिदान करण्यासाठी आलेली रुग्णही सापडली आहेत.
 
धक्कादायक बाब म्हणजे, गर्भलिंगनिदान चाचणीसाठी मोबाईल व्हॅनचाही वापर करण्यात येत होता. यांसदर्भात माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी कोल्हापुरातल्या दोन डॉक्टर आणि एजंटवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ही अटक कारवाई करण्यात आलीय. शिवाय शहरातल्या डॉ. कानडे हॉस्पिटलमध्ये धाड टाकून सोनोग्राफी मशिन सील करण्यात आलंय. यावेळी इथं गर्भलिंग निदान करण्यासाठी लागणारी औषधं आणि रुग्णही सापडलेत.
 
.

First Published: Wednesday, June 27, 2012, 08:42


comments powered by Disqus