कोल्हापुरातील गोळीबारात दोन ठार - Marathi News 24taas.com

कोल्हापुरातील गोळीबारात दोन ठार

www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापूररमध्ये कागल तालुक्यातल्या बेलवळे गावात दोन गटांत झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झालेत. हसन मुश्रीफ-संजय घाटगे यांच्या गटातील वादातून हा गोळीबार झाला.
 
या गोळीबारात मुश्रीफ गटाच्या तीन जखमींपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. दोन्ही गटातला वाद जरी किरकोळ असल्याचं सांगितलं जात असलं तरी या वादामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याचीच चर्चा आहे. ठार झालेल्यांमध्ये  प्रकाश कोतेकर आणि रवींद्र डोमळे अशी दोघांची नावं आहेत. आज सकाळी दहा वाजता हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे या दोन गटात गोळीबार झाला. त्यात भाऊसो पाटील यांच्यासह प्रकाश पाटील आणि रवींद्र डोमळे जखमी झाले.
 
पण उपचारादरम्यान प्रकाश आणि रवींद्र यांचा मृत्यू झाला. हे तिघेही मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आहेत. दरम्यान या दोन गटातील धुमश्चक्रीत १७ जण जखमी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. १९९९ मध्ये हसन मुश्रीफ आणि संजय घाडगे विधान परिषदेच्या निवडणुकीत आमनेसामने होते. त्या निवडणुकीत संजय घाडगेंचा विजय झाला होता. तेव्हापासूनच या दोघांमध्ये टोकाचं वितुष्ट आल्याचं बोललं जातंय.
 
व्हिडिओ पाहा..

First Published: Sunday, July 1, 2012, 14:58


comments powered by Disqus