पाऊस नाही आला... यांनी यज्ञच केला... - Marathi News 24taas.com

पाऊस नाही आला... यांनी यज्ञच केला...

www.24taas.com, पुणे
जुलै महिना उजाडला तरी राज्यात पावसाचा पत्ता नाही. दडी मारलेल्या पावसाने जोरदार बरसावं यासाठी पुण्यात यज्ञ करण्यात आलाय. एक- दोन नव्हे तर ५१ यज्ञ करून पावसाला साकडे घालण्यात आलं. कोंढवा परिसरात हा यज्ञ करण्यात येतोय.
 
विशेष म्हणजे यात सर्व धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेतलाय. दिवसभर हे यज्ञ कुंड पेटते ठेऊन पावसाला साकडे घातलं जातंय. शहरात पाणी संकट गहिरे होत चाललंय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांनी तळ गाठला आहे.
 
पाऊस असाच लांबला तर, पुण्यात ७ जुलै नंतर १ दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लवकर वरून राजाने बरसावे अशी प्रार्थना या यज्ञ द्वारे सामान्य माणसाने केली आहे.
 

First Published: Sunday, July 1, 2012, 21:08


comments powered by Disqus