कडुलिंबाचे किटनाशक... डासांसाठी विनाशक! - Marathi News 24taas.com

कडुलिंबाचे किटनाशक... डासांसाठी विनाशक!

www.24taas.com, पुणे
पुण्यातल्या भालचंद्र पाठक यांनी कडूलिंबाचा वापर करून पेस्टी साईड बनवलयं. त्यामुळे डासांवर नियंत्रण मिळवायला मदत होणार आहे. या संशोधनाचं त्यांना पर्मनंट रजिस्ट्रेशनही मिळालंय...पण त्यासाठी भालचंद्र पाठक यांना तब्बल २० वर्ष लढा द्यावा लागला....
 
हे आहेत भालचंद्र पाठक.... डासांवर आळा बसावा या साठी कित्येक वर्ष संशोधन करून त्यांनी बीएमआर अर्थात भारत माता रक्षक हे १०० टक्के देशी बनावटीचं रसायनविरहीत पेस्टी साईड बनवलं... कडूलिंबाच्या लिंबोळ्यातल्या औषधी तत्वावर प्रक्रिया करून त्यांनी हे पेस्टी साईड बनवलं.
 
पाठक यांच्या या संशोधनाला फरिदाबादाच्या central insectiside board अर्थात सीआयबी कडून पर्मनंट रजिस्ट्रेशन ही मिळालय...पण त्या साठी त्याना तब्बल २० वर्ष लढा द्यावा लागला. याचा वापर केल्यावर महिनाभर डासांची उत्पत्ती होत नाही...
 
१ लिटर पेस्टी साईड मध्ये ४ लिटर पाणी टाकून हे कीटकनाशक वापरता येतं. सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च होऊनही डासांवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. त्यामुळं हा कमी खर्चाचा हा पर्याय कधीही उपयुक्त असाच आहे.
 
वीस वर्ष न्यायालयीन लढाई लढल्यानंतर रजिस्ट्रेशन आणि कीटक नाशकच्या विक्रीची पाठकांना परवानगी मिळाली. यात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांचं मोठं सहकार्य त्यांना लाभलं.
देशातल्या सर्वच संस्थांनी या कीटकनाशकाचं महत्व मान्य केलंय. त्यामुळं रासायनिक कीटकनाशकांपेक्षा या कडूलिंबाच्या औषधीचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास पर्यावरणासाठीही ते पुरकच ठरेल.
 

First Published: Sunday, July 1, 2012, 22:57


comments powered by Disqus