सरकारी दवाखान्यातच गर्भलिंग निदान - Marathi News 24taas.com

सरकारी दवाखान्यातच गर्भलिंग निदान

www.24taas.com, कोल्हापूर
 
राज्यात बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर्सची चौकशी सुरू आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातच गर्भलिंग निदान होत असल्याची बाब समोर आलीये. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रुग्णालयात सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन न बसवल्यामुळे हा प्रकार होत होता.
 
ज्याठिकाणी सामान्यांवर उपचार केले जातात त्या शासकीय रुग्णालयातल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणा-यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांकडुन होते आहे. याआधी कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणा-या सात डॉक्टर्स आणि चार एजंट्सवर कारवाई करण्यात आली होती. आता या प्रकरणात जिल्हाधिका-यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
यवतमाळमध्ये रस्त्यावर अर्भक सापडले
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड-पुसद मार्गावर दोन दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी गावक-यांना रस्त्याच्या कडेला नाल्यात पडलेलं हे अर्भक जिवंत असल्याचं आढळले. लगेचच उमरखेड पोलिसांनी आणि गावक-यांनी अर्भकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. अर्भकाच्या डोळ्याजवळ जखमा झाल्या असुन त्यावर उपचार सुरू आहेत. आता हे अर्भक कोणी आणि का टाकले याबाबत तपास सुरू आहे.

First Published: Wednesday, July 4, 2012, 20:29


comments powered by Disqus