चोरीचं सत्र, म्हणून 'खोटं' मंगळसूत्र - Marathi News 24taas.com

चोरीचं सत्र, म्हणून 'खोटं' मंगळसूत्र

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
 
पुण्यात सोनसाखळी चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे बचत गटाच्या दोनशे महिलांनी खोटं मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा बचत गटाला फायदाही झालाय. कारण एका मल्टिप्लेक्सनं त्यांना अल्प दरात स्टॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
 
या महिलांनी अशी शपथ घेत खोटं मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला होता. सोनसाखळी चोरानं हिसका दिला तरी त्यामुळं नुकसान होणार नाही, असा या मागचा हेतू होता. या निर्णयामुळे सिंहगड रस्त्यावरील अभिरूची मॉलनं त्यांना मल्टीप्लेक्समध्ये स्टॉल उभारण्याची ऑफर दिली. आणि आता इथे वीस बचत गटांचे मॉल सुरू झालेत.
 
मॉलमध्ये येणा-या ग्राहकांना बचत गटांचा इतरांच्या तुलनेत स्वस्त असणारा आणि उच्च दर्जा असणारा माल मिळू शकतो. या संकल्पनेतून मॉलमध्ये बचत गटांना स्टॉल देण्यात आले आहेत. खोटं मंगळसूत्र घालण्याच्या निर्णयामुळं महिलांना स्टॉलच्या रूपातून फायदाच मिळवून देणारा ठरल्याचं यातून स्पष्ट होतंय.

First Published: Sunday, July 15, 2012, 18:42


comments powered by Disqus