साहित्य संमेलनाचा मुहूर्त ११ जानेवारीला - Marathi News 24taas.com

साहित्य संमेलनाचा मुहूर्त ११ जानेवारीला



www.24taas.com, पुणे
 
८६वं अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणमध्ये होणार आहे. ११,१२ आणि १३ जानेवारीला संमेलन होणार आहे. पुण्यात साहित्य मंहामंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
 
महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी हा निर्णय जाहीर केला. साहित्य संमेलनाला राज्य सरकार २५ लाखांचे अनुदान देते. मागील १० वर्षापासून २५ लाख अनुदान देण्यात येत आहे. मात्र, १० वर्षात महागाई मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, साहित्य संमेलनाला मिळणा-या अनुदानात वाढ केली जावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केली आहे.
 
‘आमच्या रेषा, बोलतात भाषा’ हा नवीन उपक्रम चिपळूण येथील साहित्य संमेलनात यावेळी असणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर देखील एका विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय. तर, विश्व मराठी साहित्य संमेलन ३१ ऑगस्ट, १ आणि २ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

First Published: Monday, July 16, 2012, 09:52


comments powered by Disqus