पत्नीला अश्लील फोटो पाठविणारा पती अटकेत - Marathi News 24taas.com

पत्नीला अश्लील फोटो पाठविणारा पती अटकेत

www.24taas.com, कोल्हापूर
 
दोघांचा प्रेमविवाह. मात्र, पतीच्या मनात संशयाची पाल चुकचुली. पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय वाढला. यातून पत्नीला धडा शिकविण्यासाठी त्याने नाटक रचले आणि हे नाटक त्याच्यावरच उलटेल याची कल्पना नव्हती. त्यामुळे आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेला प्रवीण अलगच पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
 
वय वर्षे २८. नाव प्रविण प्रल्हादन नायर. नायर हा मूळचा गोवा येथील राहणारा आहे. तो शिक्षणासाठी बेळगाव येथे आला असता त्याचे आर्किटेक्चर डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीशी ओळख झाली. त्यातून त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले.
 
घरातील लोकांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न केले. लग्नानंतर प्रवीण तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत असे. त्याला कंटाळून त्याची पत्नी कोल्हापूरला आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहू लागली. त्यामुळे ती सुखात राहिल, अशी तिची समजूत होती. मात्र, पत्नीला धडा शिकविण्याचा चंग प्रविणने बांधला आणि तो कामाला लागला.
 
पत्नीला ब्लॅकमेल करण्यासाठी प्रवीणने एका वेबसाईटवर पत्नीचे बनावट खोटे रेकॉर्ड केले, तसेच वेबसाईटवर पत्नीचे अश्लील फोटोआणि माहिती प्रसिद्ध करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू लागला. संबंधित विवाहितेच्या हा प्रकार लक्षात आल्याने तिने जुना राजवाडा पोलीसात प्रवीणच्याविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
 
 
 

First Published: Tuesday, July 17, 2012, 12:38


comments powered by Disqus