अण्णा-बाबा करणार 'निर्णायक' आंदोलन - Marathi News 24taas.com

अण्णा-बाबा करणार 'निर्णायक' आंदोलन

www.24taas.com, पुणे
 
लोकपाल, काळापैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकत्रित निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. ९ ऑगस्टपासून रामदेवबाबा आंदोलन करणार आहेत.
 
निर्णायक आंदोलनापूर्वी अण्णा आणि बाबा २५ जुलै रोजी एक देशव्यापी आंदोलनही करणार आहेत. आज पुण्यातील एका सभेत त्यांनी ही घोषणा केलीय. यावेळी अण्‍णांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केलीय. लोकपालच्या मुद्यावर सरकारनं फसवलंय, भ्रष्टाचार मिटवण्याची सरकारची इच्छा नाही असा पुनरुच्चार अण्णांनी यावेळी केलाय. केंद्र सरकार फक्त आश्‍वासन देतं, पण, आता आश्‍वासन देऊन चालणार नाही. केंद्रातील सर्व मंत्री भ्रष्‍टाचारी आहेत. लोकपाल विधेयकासाठी केलेल्‍या उपोषणाला आता वर्ष पूर्ण होईल, पण सरकारनं संसदेत ठराव मंजूर करण्यापलिकडे काहीही केलं नसल्याचं अण्णांनी म्हटलंय. सरकारनं आतापर्यंत नुसती आश्वासने दिली मात्र आता लोकपाल मंजूर झाल्याखेरीज माघार नाही असा निर्धार अण्णांनी व्यक्त केलाय.
 
.

First Published: Tuesday, July 17, 2012, 12:35


comments powered by Disqus