पुण्यात हुंडाबळी, पती आणि सासू-सासरे अटक - Marathi News 24taas.com

पुण्यात हुंडाबळी, पती आणि सासू-सासरे अटक


www.24taas.com,पुणे
 
माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून महिलेला पतीनं दरीत ढकलल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सुनीता शेवते असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.
 
सुनीताच्या हत्येप्रकरणी पती विक्रम शेवते आणि तिच्या सासू सास-यांना अटक करण्यात आली आहे. विक्रम आणि त्याचे आई वडील सुनीताला पैशाच्या कारणावरुन नेहमी सतवायचे. त्यातून त्यांच्यात वाद होत होते. शुक्रवारी विक्रम सुनीताला फिरण्यासाठी  म्हणून वरंधा घाटात घेऊन गेला. घाटातल्या कावळा कड्याजवळ नेऊन त्यानं तिला ६०० फुट खोल दरीत ढकलून दिलं.
 
त्यानंतर सुनीतानं आत्महत्या केल्याचा बनावही त्यानं रचला. पोलिसांनी गिर्यारोहाकांच्या मदतीनं सुनीताचा मृतदेह शोधून काढलाय. वानवडी पोलीस पुढचा तपास करत आहेत.

First Published: Tuesday, July 17, 2012, 18:51


comments powered by Disqus