Last Updated: Tuesday, July 17, 2012, 21:18
www.24taas.com, सातारा सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा आला. विवेक पंडित यांनी साता-यात महसूल खात्याच्या चुकीच्या धोरणाबाबत आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या अन्यायाविरोधात मोर्चा काढला होता. मात्र उदनयराजेच या मोर्चात सहभागी झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला.
आ. विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र उदयनराजे, विवेक पंडित आणि शेतकरी एकत्रित मोर्च्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. या दरम्यान उदयनराजे भोसले समर्थकांनी आ. विवेक पंडित यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
मोर्च्यात २५० - ३०० शेतकरी सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यातील जमिनी खूप मोठ्या प्रमाणात उदयनराजे कुटुंबियांच्या नावे आहेत मात्र त्यांचा कब्जा या शेतक-यांकडे होता. त्याची नोंद ही महसूल दफ्तरी होती. मात्र १९९७-१९९८ मध्ये या जमिनींवर महसूल दफ्तरी कब्जेदार म्हणून उदयनराजे आणि भवानी देवी संस्थान किल्ले प्रतापगड अशी नोंद करण्यात आली. त्यामुळे या शेतकऱ्यांना जमिनींचे व्यवहार करता येत नाहीत. यावर न्याय मिळावा अशी शेतक-यांची मागणी आहे.
First Published: Tuesday, July 17, 2012, 21:18