Last Updated: Thursday, July 19, 2012, 18:39
www.24taas.com, पुणे अंगावर फोडणी उडाली म्हणून पतीनं पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड येथे घडलाय. काळूराम लोखंडे असं या नराधमाचं नाव आहे.
पिंपरीच्या भारतमाता नगरात राहणा-या काळुराम लोखंडे यानं त्याच्या पत्नीची हत्या केलीय. सकाळी सव्वा आकाराच्या सुमाराला सुरेखा स्वयंपाक करत होती. त्यावेळी तिचा पती काळुराम याच्या अंगावर फोडणी उडाली. या क्षुल्लक कारणावरुन तो संतापला आणि त्यानं सुरेखावर चाकूचे वार करत किला ठार केलं.
या घटनेनंतर पिंपरी पोलिसांनी काळूरामला अटक केलीय. पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या महिन्यात एका पाठोपाठ झालेल्या हत्यांनंतर काही काळ शांतता होती. पण पुन्हा क्षुल्लक कारणावरुन नराधमानं पत्नीचीच हत्या केल्यानं पुन्हा खळबळ उडालीय.
First Published: Thursday, July 19, 2012, 18:39