Last Updated: Thursday, December 15, 2011, 15:44
झी २४ तास वेब टीम, सातारा लहानग्या बाळाला धुरी देत असताना गुदमरुम बाळाचा आणि आजीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना सातारा शहरात घडलीय. सदर बाजार परिसरात अनिल लाड यांच्या बंगल्यात हा सर्व प्रकार घडलाय.
अनिल लाड यांची कन्या अर्चना उन्मेष हिला पुत्र झाल्यानं ज्या घरात काही दिवसांपूर्वी आनंद साजरा झाला, त्याच घरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. १२ दिवसांच्या बाळाला शेक देत असताना हा प्रकार घडला. घराचे खिडक्या आणि दरवाजे बंद असल्यानं गुदमरून लहानग्या बाळाचा मृत्यू झाला, तर धुरामुळं अत्यवस्थ झालेल्या रंजना लाड या आजीचा हॉस्पिटलात मृत्यू झाला.
या बाळाची आई अर्चना अन्मेष यांची प्रकृती चिंताजनक आहे.
First Published: Thursday, December 15, 2011, 15:44