बिल्डरसाठी... प्रशासनाची झाली 'गांधारी'! - Marathi News 24taas.com

बिल्डरसाठी... प्रशासनाची झाली 'गांधारी'!

www.24taas.com, पुणे
 
पुण्याभोवती डोंगरफोड सुरूच आहे. वारंवारपणे ही बाब उजेडात आणूनही प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. भूगावमधला डोंगर उद्ध्वस्त करण्याचं कामही असंच सुरू आहे. त्यामुळे केवळ बिल्डरच्या फायद्यासाठी प्रशासननं 'गांधारी'चं सोंग घेतल्याची टीका स्थानिकांधून होतेय.
 
कित्येक फुटापर्यंत हा डोंगर खोदण्यात येतोय, त्यासाठी शेकडो झाडांची कत्तलही करण्यात आलीय. हे चित्र आहे पुण्याला लागून असलेल्या भूगावमधलं. डोंगर फोडून इथं साठ फुटांचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येतोय. डोंगराच्या उताराप्रमाणे माथाही सपाट केला जातोय. हजारो ब्रास उत्खननाची रॉयल्टीही महसूल विभागाकडे भरण्यात आलेली नाही. कारण रॉयल्टी भरली तर हा चोरीचा मामला उघड होणार आहे. शहरात पहायला मिळणार नाहीत असे रस्ते इथं बांधण्यात आले आहेत. ड्रेनेज, स्टीट लाईटच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, हे सर्व करताना पर्यावरण, महसूल आणि नगर रचना विभागांचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. बिल्डरच्या फायद्यासाठी सरकारी यंत्रणा जुंपल्याचंच हे चित्र आहे.

First Published: Saturday, July 21, 2012, 16:26


comments powered by Disqus