अजितदादांनीच करावं राज्याचं नेतृत्व- आबा पाटील - Marathi News 24taas.com

अजितदादांनीच करावं राज्याचं नेतृत्व- आबा पाटील


www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
राज्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं त्यांच्यात कर्तृत्व आहे, अशी स्तुती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. ते पिंपरीत बोलत होते.
 
राज्याचं नेतृत्व करण्यास सक्षम असलेले ते एकमेव नेते असल्याचं मत आर. आर. पाटील यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत अजितदादा सक्षमपणे काम करत असल्याचंही आर. आर. पाटील यांनी म्हटलंय.
 
शरद पवार यांना केंद्रात दुय्यम स्थान देण्याच्या मुद्द्यावर बोलतानाही आबांनी दुय्यम स्थान पवारांना नाही तर महाराष्ट्राच्या वाट्याला आल्याचं मत व्यक्त केलंय. काँग्रेसवरील नाराजीनंतर आबांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय.

First Published: Sunday, July 22, 2012, 22:26


comments powered by Disqus