अल्पवयीन मुलींच्या विक्रीचं रॅकेट - Marathi News 24taas.com

अल्पवयीन मुलींच्या विक्रीचं रॅकेट

www.24taas.com, सोलापूर
 
सोलापूर-कर्नाटक सीमेवर मंद्रुप गावाजवळच्या जंगलात अल्पवयीन मुलींच्या विक्रीचं रॅकेट पोलिसांनी उधळून लावलंय. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केलीय.
 
नोकरीचं आमिष दाखवून बांग्लादेशातून आणलेल्या मुलींची विक्री करण्यात येत होती. याबाबत माहीती पुण्याच्या रेस्क्यू फाऊंडेशनला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून छापा घातल्यानं या अल्पवयीन मुलींच्या तस्करीचा डाव हाणून पाडला आणि या बांग्लादेशातल्या नऊ अल्पवयीन मुलींची सुटका झाली.
 
चांगल्या रोजगाराचं आमिष दाखवून या मुलींना बाग्लादेशातून भारतात आणलं जातं. विशेष म्हणजे केवळ चाळीस हजार रुपायांना एका मुलीची खरेदी केली जाते. आणि सीमावर्ती भागात दोन लाखांना विक्री केली जाते. या मुलींचा देहविक्रीसाठी वापर केला जातो. जर या मुलींनी विरोध केला तर त्यांना सिगारेटचे चटके दिले जातात किंवा अंगभर धारदार शस्त्रानं जखमा केल्या जातात.
 
मुलींची विक्री करत असताना पोलिसांनी या मुलींची सुटका केलीय. गारमेंटच्या क्षेत्रात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून या मुलींना बेकायदा भारतात आणलं जातं. आणि नोकरीच्या नावाखाली त्यांना देहविक्रीच्या अनैतिक धंद्यात ओढलं जातं. त्यांनी विरोध केल्यास सिगारेटचे चटके किंवा अंगभर धारदार शस्त्रानं जखमा केल्या जातात. अल्पवयीन मुलांची तस्करी करणारी एखादी टोळी कार्यरत असणारी टोळीच कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
 
व्हिडिओ पाहा...

First Published: Monday, July 23, 2012, 11:31


comments powered by Disqus