Last Updated: Thursday, July 26, 2012, 19:33
www.24taas.com, पुणे पिंपरीमधले नगरसेवक नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. पण ही चर्चा चांगल्या कामांसाठी कमी इतर उद्योगांसाठीच जास्त असते. आताही पिंपरी चिंचवड मधले सत्ताधारी पक्षाचे नगर सेवक चर्चेत आलेत. महापालिकेची बहुतेक कामं नगरसेवक त्यांच्या नातेवाईकांच्या नावे घेत असल्याचा आरोप शिवसेनेन केलाय.
नगरसेवकाला मिळणा-या साडे सात हजार रुपयांच्या मानधनावर त्यांचा उदार निर्वाह चालतो कसा, हा प्रश्न कायमच पडतो. पण त्याचं उत्तर आता समोर येऊ लागलंय. अनेक नगरसेवक महापालिकेच्या विविध कामांचा ठेका अप्रत्यक्षपणे घेत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. उद्यानांची देखभाल, दिवा बत्ती, भंगार गोळा करणं, सुरक्षा रक्षक पुरवणं अशी विविध कामं नगरसेवकांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी निगडीत व्यक्तींची असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. त्यात शहराचे उपमहापौर राजू मिसाळ यांचाही समावेश असल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे यांनी केलाय.
उपमहापौरांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. नगरसेवक कितीही आरोप फेटाळत असले शहरातली विविध कामं कोण घेतं, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.
First Published: Thursday, July 26, 2012, 19:33