पुणे कसं झालं 'टार्गेट', स्फोटांची मालिका.... - Marathi News 24taas.com

पुणे कसं झालं 'टार्गेट', स्फोटांची मालिका....

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात बुधवारी चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाले.. या स्फोटानंतर काही वेळानंतर आणखी दोन ठिकाणी स्फोटकं निकामी करण्यात आले. रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटांमुळं पुणेकरांमध्ये घबराट निर्माण झाली होती. पुणे पुन्हा एकदा हादरलं... एकामागून एक झालेल्या चार स्फोटांनी पुणेकर पुन्हा धास्तावलेत... पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर चार ठिकाणी हे स्फोट झाले...
 
वेळ.. ७.३० वाजता.... प्रसिद्ध आणि पुण्याचं मानबिंदू असणा-या बालगंधर्व रंगमंदिराजवळ पहिला स्फोट झाला... त्यानंतर वेळ साधारणपणे ७.४५ ची मॅकडोनाल्ड जवळ दुसरा स्फोट झाला. इथं असणा-या कच-यात असलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. वेळ रात्री ७.५३ देना बँकेच्या एटीएमजवळ तिसरा स्फोट झाला... तर अवघ्या काही मिनिटांनंतर चौथ्या स्फोटाचंही वृत्त येऊन धडकलं... वेळ साधारणपणे ८.१० मिनिटांची.... पुण्यातल्या गरवारे चौकात चौथा स्फोट झाला... या चारही ठिकाणांहून जवळच अण्णांच्या समर्थनार्थ होणा-या उपोषणाचा मंडप आहे... एक किलोमीटरच्या परिसरात आणि अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये हे चारही स्फोट झाले.
 
वेळ ८.४५ मिनिटे... या स्फोटानंतर आणखी २ ठिकाणची स्फोटकं निकामी करण्यात आली... या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाली असू दयानंद पाटील असं त्याचं नाव आहे... त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं... रात्री ११ वा... पाटील यांच्या हातातील पिशवीत स्फोट झाल्यानं पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं... ऐन संध्याकाळच्या वेळी, सणासुदीच्या काळात रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या चार स्फोटांनी पुणेकरांमध्ये पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.
 
 
 
 
 

First Published: Thursday, August 2, 2012, 11:46


comments powered by Disqus