सांगलीत बॉम्बसदृश वस्तूंमुळे खळबळ - Marathi News 24taas.com

सांगलीत बॉम्बसदृश वस्तूंमुळे खळबळ

www.24taas.com, सांगली
 
सांगली जिल्ह्यातील गोंधळेवाडी गावात आज दोन हातबॉम्बसदृश्य वस्तू  आढळल्या.  वरिष्ठ पोलीस अधिकारी या गावात दाखल झाले असून बॉम्ब शोध आणि निकामी या पथकाच्याद्वारे या वस्तूची तपासणी केली  जाणार आहे.
 
बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यामुळे गावात घबराटीचे वातावरण पसरलंय. जत तालुक्यातील गोंधळेवाडी गावात  ही घटना घडलीय. एका झाडाखाली मोठ्या लिंबाच्या आकाराच्या संशयास्पद वस्तू सातवीतील एका विद्यार्थ्याला सापडल्या. केरापा ढेबरे या विद्यार्थ्यानं या वस्तू  शाळेतील  शिक्षकांना  दाखवल्या. ग्रेनेड सारख्या या दिसणा-या या वस्तू बघितल्यानंतर शिक्षकांनी याची माहिती पोलिसांना दिली.
 
वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी  येवून  बॉम्ब  सदृश्य  वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. बॉम्ब  शोध  आणि निकामी पथकाद्वारे याची तपासणी केली जाणार आहे. या वस्तू या ठिकाणी कोणी आणून टाकल्या याचा शोध पोलीस घेत आहेत.

First Published: Thursday, August 2, 2012, 15:31


comments powered by Disqus