Last Updated: Thursday, August 9, 2012, 03:34
www.24taas.com, पुणे
पुणे साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर दहीहिंडी साजरी करण्यास पुणे पोलिसांनी मनाई केलीय. ‘दहीहंडी रस्त्यांवर नको तर मोकळ्या मैदानात साजरी करा’ असं आवाहन पोलिसांनी गोविंदा पथकांना केलंय.
पुणे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्यावर दहीहंडी साजरा करण्यास मनाई केलीय. दुसरीकडे या निर्णयामुळे पुण्यातील गोविंदांच्या आनंदावर विरजण पडलय. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो मात्र, आता पोलिसांनी रस्त्यांवर दहीहंडी साजरी करण्यास मनाई केल्यानं त्यांना मोकळ्या मैदानातच आनंद घेता येणार आहे. त्यातच पुण्यात मैदानांची संख्या कमी असल्यानं गोविंदामधून नाराजीचा सूर उमटलाय.
.
First Published: Thursday, August 9, 2012, 03:34