गगनची पुण्यात भव्य मिरवणूक - Marathi News 24taas.com

गगनची पुण्यात भव्य मिरवणूक

www.24taas.com, पुणे
ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या गगन नारंगचं पुणे एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
 
‘लंडन ऑलिम्पिक 2012’मध्ये गगन नारंगनं 10 मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझ मेडलची कमाई केलीय. ऑलिम्पिक मेडल पटकावत नारंगनं भारताचा तिरंगा लंडनमध्ये डौलानं फडकावला. एअरपोर्टवर जोरदार स्वागत केल्यानंतर त्याची बालेवाडीत भव्य मिरवणूकही काढण्यात आली. बालेवाडी चौकापासून ते शूटिंग रेंजपर्यंत नारंगची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
 
 
.

First Published: Thursday, August 9, 2012, 03:47


comments powered by Disqus