Last Updated: Sunday, December 25, 2011, 08:39
झी २४ तास वेब टीम, पुणे 
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर काल रात्री एक भीषण अपघात झाला. काल रात्री १२:१५च्या दरम्यान हा अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघात ६ जण जागीच ठार झाले तर १२ जण जखमी झाले आहेत. पुणे एक्सप्रेस वेवरील देवले ब्रिज ते मळवली या दरम्यान हा अपघात झाल्याचे समजते.
मिनी बस अत्यंत वेगात असल्याने डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली, यातील सर्व प्रवासी हे गिरिकन ट्रव्हल्सचे प्रवासी होते. हे सारे प्रवासी मुंबईमार्गे विमानाने आज थायलंडला जाणार होते. बस ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा विचित्र अपघात घडला, अपघातातील सर्व जखमींना पिंपरी- चिंचवड येथील लोकमान्य रूग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे त्यांचावर उपचार सुरू असल्याचे समजते.
अपघातात मृत्यूमुखी झालेल्या मृतांची नावे -प्रतिक जोशी (वय २२) - कराड, संजय टिकले (वय ६०), अनूजा संजय टिकले (वय ६०) - पुणे, विजेंद्र मठकर (वय ६०) - गंगाराम सोसायटी पुणे, मिनाक्षी महाजनी (वय ५५) - कोथरूड पुणे, अंकुश जाधव - बस ड्रायव्हर
First Published: Sunday, December 25, 2011, 08:39