कोल्हापूरमध्ये टोलला विरोध. - Marathi News 24taas.com

कोल्हापूरमध्ये टोलला विरोध.

झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर
 
कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांचं काम जवळजवळ ९५ टक्के पूर्ण झालं आहे असं कंत्राटदार कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे. त्याबरोबरच टोलवसुलीचा अध्यादेशही मिळाला आहे. मात्र, टोल लागू करण्यासाठी लोकांचा प्रचंड विरोध होतो आहे.
 
यामुळं कंत्राटदार आयआरबी कंपनी हैराण झाली आहे. अखेर कंपनीने काल पत्रकारांना शहरातील रस्त्यांचा दौरा करून  ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. लोकांचा रोष पत्करण्यासकाँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक तयार नाहीत. मात्र, दुसरीकडे टोलविरोधात ठामपणेही हे नगरसेवक बोलताना दिसत नाही आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावर गप्प बसणं पसंत केलं आहे. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक या दोघांच्या भूमिकाच वेगवेगळ्या असल्याचं चित्र सध्या पहायला मिळतं आहे.
 
हिवाळी अधिवेशनात मुंबई आणि ठाण्यात झालेल्या टोलच्या घोटाळा समोर येताच अनेक कंत्राटदार कंपनींचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. त्यानंतर टोल नाक्यावर झालेले रास्तारोको. यामुळे राज्यात पुन्हा एकदा टोलच्या घोटाळ्या विषयाचा प्रश्न समोर आला आहे.
 

First Published: Sunday, December 25, 2011, 13:53


comments powered by Disqus