'सहारा'साठी एक्स्प्रेसवेचे वाजवले बारा! - Marathi News 24taas.com

'सहारा'साठी एक्स्प्रेसवेचे वाजवले बारा!

झी २४ तास वेब टीम, पुणे
 पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील डिव्हायडर आणि संरक्षक भिंती  धोकादायक पद्धतीनं तोडण्यात आल्या आहेत. पुण्याजवळील गहूंजे इथं हा धक्कादायक आणि धोकादायक प्रकार उघडकीस  आला आहे.
 
 एक्स्प्रेस हायवेला लागूनच महाराष्ट्र क्रिकेट  असोसिशननं नवीन स्टेडियम उभारलं आहे. या स्टेडियमवर  जाण्या येण्यासाठी अपघाताला निमंत्रण देणारा हा प्रकार करण्यात  आला असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला.
 
एक्स्प्रेस हायवेवरून स्टेडियमवर गेल्यास आठ ते दहा किलोमीटर अंतर वाचते. तसंच वेळेची मोठी बचत होते. त्यामुळे एक्स्प्रेस हायवेवरील डिव्हायडर आणि संरक्षक भिंत तोडण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
 
एक्स्प्रेस हायवेवरील डिव्हायडर आणि संरक्षण भिंत फोडल्यामुळे संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं होतं. मात्र, या स्टेडियमसाठी बेकायदा प्रकार करण्यात आला असल्यानं त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. एक्स्प्रेस हायवेचे व्यवस्थापन असलेली आयआरबी कंपनी आणि महाराष्ट्र रस्ते विकास मंडळानं या प्रकाराकडे पूर्णपणे डोळे झाक केली आहे.
 

First Published: Sunday, December 25, 2011, 22:31


comments powered by Disqus