झोप नाही मला, ठाकरे असे का वदलात? - Marathi News 24taas.com

झोप नाही मला, ठाकरे असे का वदलात?

झी 24 तास वेब टीम, पुणे
 
उद्धव ठाकरे आणि अजित पवार वादाला आता नवी फोडणी मिळाली आहे. ‘उद्धव ठाकरेंसारख्या जागतिक दर्जाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तीनं माझ्यावर टीका केल्यामुळे दोन दिवस मला झोपच लागली नाही,’ असं उपहासात्मक उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.
 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी केलेली टीकेमुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत, अजित पवारांनी बाळासाहेबांच्या भाषणानंतर शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले त्यामुळे या वादामध्ये उद्धव ठाकरे यांनी उडी घेतल्याने नव्या वादास तोंड फुटले.
 
उद्धव ठाकरे यांनी अजित पवार फडतूस माणूस आहे. त्यांनी कोणता विकास केला, असा सवाल केला होता. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. एकूणच हे दिलेले उत्तर अतिशय उपहासात्मक पद्धतीचं आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे या साऱ्या प्रकरणास कशा प्रकारे हाताळता हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच

First Published: Sunday, October 9, 2011, 15:22


comments powered by Disqus