एकविरा देवीच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न - Marathi News 24taas.com

एकविरा देवीच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
एकविरा देवीच्या मंदिरात चोरांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे या चोरांनी चिडून पोलिसांवरच दगडफेक केली,  त्यामुळे पुन्हा एकदा मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे, त्यातच पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पुढे आला आहे.
 
पुण्याजवळच्या कार्ला इथल्या प्रसिद्ध एकविरा देवीच्या मंदिरात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या धाडसामुळं चोरीचा प्रय़त्न फसला. यावेळी चोरट्यांनी पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलिसही जखमी झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास हि घटना घडली.
 
घटनेनंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मंदिराला भेट दिली. तसंच जखमी पोलिसांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. एकविरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदैवत आहे.

First Published: Friday, December 30, 2011, 20:13


comments powered by Disqus