Last Updated: Monday, January 2, 2012, 14:08
झी २४ तास वेब टीम, पुणे 
अण्णा हजारेंना एक महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळेच अण्णांनी उपोषण आणि प्रवासही करु नये, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे पाच राज्यांमधल्या निवडणुकांत अण्णा प्रचार करणार की नाही, याबद्दल शंका आहे. अरविंद केजरीवाल आज अण्णांची भेट घेणार असल्याचं समजतं आहे.
दरम्यान अण्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर आपल्या प्रकृतीची नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन अण्णांनी स्वतःच केलं आहे. डॉक्टरांच्या उपचाराने प्रकृती सुधारत चालल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अण्णांवर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अण्णांच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या असून, हळूहळू तब्येतीत सुधारणा होत आहे. अण्णांच्या श्वासनलिकेला थोडीफार सूज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे, तसचं अण्णा पुढील काही दिवस तरी संपूर्ण आरामाची गरज आहे.
First Published: Monday, January 2, 2012, 14:08